अपर्टियम हा मुक्त/ओपन-सोर्स संगणकीय भाषांतराच्या साधनांचा समूह आहे. पूर्वी ही साधने फक्त् जवळचे संबंध असलेल्या भाषांसाठी उपयुक्त होती, पण ती आता इतर भाषांमधल्या भाषांतरासाठीही वापरली जाऊ शकतात, जसे की इंग्रजी-कॅटलान. ही साधने नेमकी कोणती?
अपर्टियम मध्ये नवीन डेव्हलपर्सचे नेहमी स्वागत असते: तुम्हाला जर ही साधने किंवा हा भाषांचा डेटा सुधारण्यात मदत करायची असेल, तर आमच्याशी जरूर संपर्क साधा.
आमच्या विकीवर तांत्रिक निर्देश 'Documentation' ह्या पृष्ठावर उपलब्ध आहेत. विविध कॉन्फरन्स् आणि जर्नल मधले लेख 'Publications' ह्या पृष्ठावर उपलब्ध आहेत.
अपर्टियमच्या साधनांच्या आणि भाषांच्या डेटाच्या चालू आवृत्त्या सोर्सफोर्जवर उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या संगणकांवर अपर्टियम इन्स्टॉल करण्यासाठी निर्देश विकीवर उपलब्ध आहेत.
जर तुम्हाला काही चूक सापडली असेल, तुम्हाला नवीन फीचर्सची इच्छा असेल, किंवा तुम्हाला मदत करण्याची इच्छा असेल, तर आमच्याशी जरूर संपर्क साधा.
आमच्याशी संपर्क साधण्याचा सर्वात तुरंत मार्ग म्हणजे आमचे आय.आर.सी. चॅनेल, #apertium (irc.freenode.net ह्या सर्व्हरवर). ह्या चॅनेलवर डेव्हलपर्स् आणि इतर यूजर्सशी बोलायला freenode webchat वापरू शकता.
apertium-stuff मेलिंग लिस्टला सबस्क्राइब केल्यास तुम्ही तुमचे प्रस्ताव किंवा तुमच्या समस्या सविस्तर मांडू शकता, आणि इतर चर्चांमध्ये सहभागी होऊ शकता.
जर तुम्हाला काही चूक सापडली असेल, तुम्हाला नवीन फीचर्सची इच्छा असेल, किंवा तुम्हाला मदत करण्याची इच्छा असेल, तर आमच्याशी apertium-contact मेलिंग लिस्टद्वारेही संपर्क साधू शकता.
या वेबसाईटची देखभाल Apertium तर्फे केली जाते. apertium-contact@lists.sourceforge.net
जर तुम्हाला काही चूक सापडली असेल, तुम्हाला नवीन फीचर्सची इच्छा असेल, किंवा तुम्हाला मदत करण्याची इच्छा असेल, तर आमच्याशी जरूर संपर्क साधा.
ही वेबसाईट खूप हळू चालते आहे का? आमच्या सर्वर्सवर कदाचित जास्त भार असेल. पण तुम्ही स्वतःच्या संगणकावरही अपर्टियम इन्स्टॉल करू शकता!